Posted by admin on 2024-05-23 11:36:29 |
Share: Facebook | Twitter | Whatsapp | Linkedin Visits: 93
छत्रपती संभाजी नगर शहरातील राधा बजाज यांना मास्टर माइंड अबॅकस अँड ब्रेन जिम सेंटरच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकन मिळाले, सौ.पुनम सारडा यांनी भगवतगीतेच्या शृंगेरी मठातील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर कु.चैत्रा मकरंद दिवाण हिने सीबीएससी परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या अनुषंगाने नगरसेविका सौ.माधुरीताई अदवंत यांच्या वतीने सिडको, एन -४ येथील विघ्नहर्ता गणेश मंदिर येथे त्यांचा कौटुंबिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून सर्वांचा गौरव, सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
आपल्या शहरातील नागरिक विविध क्षेत्रात स्वतःसह समाजाचे शहराचे नाव उंचावत आहेत, हे अत्यंत समाधानकारक असते..
#छत्रपती_संभाजीनगर #सत्कार_समारंभ #Chhatrapati_SambhajiNagar